वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

शांति क्षमा दया सर्व

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090134 · अभंग क्र. १६९

169.
शांति क्षमा दया सर्वभावे करुणा । तोचि नारायणा आवडे दासु ॥१॥
तोचि एक साधु बोलिजे पै जनी । निरंतर ध्यानी कृष्णमूर्ति ॥२॥
जीवशिव एक सर्वत्र चैतन्य । ऐसे जया कारुण्य तोचि धन्य ॥३॥
तोचि एक भक्तु हरि हरि म्हणे । नित्य नारायणे तारिजे त्यासि ॥४॥
येउनि जनी सदा पै तो विदेही । तारकू सबाही सप्रेमळु ॥५॥
निवृत्ति सांगतु भक्तीचा महिमा । करी शांति क्षमा तो विरळा असे ॥६॥

अर्थ:
ज्याच्याकडे दया, क्षमा, शांती व करुणा भाव आहे असा भक्त भगवंताचा आवडता दास असतो. ज्याच्या ध्यान्यात सतत ती कृष्णमूर्ती असते त्याला लोकांनी साधु म्हंटले पाहिजे.जाच्या कडे जीव व शीवाकडे सम्यक दृष्टीने पाहण्याची दृष्टी आहे व जो करुणेचा झरा आहे तोच घक्त धन्यत्वाला पोहचतो. जो भक्त सतत हरि नामाचा घोष करतो त्यालाच तो नारायण तारत असतो. जे महात्मे जनामध्ये विदेही अवस्थेत वावरुन त्यांना प्रेम देतात तेच जगाचे तारक होतात. निवृतिनाथ म्हणतात, जो सतत हरिनामाचा गजर करतो व शांती क्षमा आपल्या अंगी बाणवतो मी त्याच भक्तांचा महिमा सांगत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग