वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

कमळाच्या स्कंधी गुणी

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090101 · अभंग क्र. १६७

167.
कमळाच्या स्कंधी गुणी गुढारले । वरी आकारले फूल तया ॥१॥
सुमनाचेनि वासे भ्रमर भुलले । मार्ग पै विसरले इंद्रियांचा ॥२॥
तैसेहे संत विठ्ठली तृप्त । नित्य पै निवांत हरि चरणी ॥३॥
नाठवे हे दिन नाठवे निशी । अखंड आम्हांसि हरिराजा ॥४॥
तल्लिन प्रेमाचे कल्लोळ अमृताचे । डिंगर हरिचे राजहंस ॥५॥
टाहो करू थोर विठ्ठल कीर्तने । नामाच्या सुमने हरि पुजू ॥६॥
निवृत्ति निवांत तल्लीन पै झाला । प्रपंच आबोला हरिसंगे ॥७॥

अर्थ:
कमळाच्या देठ सकट कमळाची कळी ही देठच वाटते व नंतर कमळ फुलले की ते देठवर नसल्यासारखे वाटते त्या फुलामुळे ते देठ दिसत नाही. कमलदलाच्या सुंगंधामुळे ते भ्रमर येवढे मोहित होतात की त्यांच्या इंद्रियाद्वारे लाकुड पोखरण्याचा गुणधर्म विसरतात.तसेच हे संत त्या विठ्ठल नामात तृप्त होतात व त्या विठ्ठल चरणकमलांवर निवांत होतात. त्या हरिनामामुळे ते रात्र व दिवस ही विसरतात. ज्ञान व अज्ञान हा निरक्षीर विवेक असणारे हे विठ्ठलाचे जणु राजहंसच आहेत त्या मुळे ते त्या नामामृत प्रेमाने तल्लिन होतात.हे संत विठ्ठलनामाचा टाहो करुन कीर्तन करतात व त्याच विठ्ठलाच्या नामाने त्याचीच पूजा बांधतात. निवृतिनाथ म्हणतात, मी त्या नामचिंतनामुळे प्रपंचाचा निरास करुन त्या नामघोषात निवांतपणे तल्लिन झालो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग