वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

विठ्ठल माउली कृपेची

🙏 4. संत नामदेव · ABH-082843 · अभंग क्र. १५१८

1518.
विठ्ठल माउली कृपेची कोंवळी | आठविता घाली प्रेमपान्हा ॥१॥
मज का मोकलिले कबणा निरविले | कठिण कैसे जाले हृदय तुझे ॥२॥
तुजविण जिवलग दुर्जे कोण होईल | ते माझे साहिल जड भारी ॥३॥
तू माझी माउली मी वो तुझा बच्छ | परतो परतो वास पाहे तुझी ॥४॥
माया मोहे कैसी न विसंबे सर्वथा | अंतरींची व्यथा कोण जाणे ॥५॥
नामा म्हणे विठ्ठले का गे रुसलिसी | केव्हा सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग