अगे तू माउली संतांची
1517.
अगे तू माउली संतांची साउली | आठविता घाली प्रेमपान्हा ॥१॥
प्रेमपान्हा पाजी अगे माझे आई | विठाई गे मायी वोरसोनी ॥२॥
येतो काकुळती प्रेम पान्ह्यासाठी | उभा तो धुर्जटी मागे पुढे ॥३॥
नामा म्हणे जीवे करीन लिंबलोण | ओवाळिन चरण विटेसहित ॥४॥
