तुझे मजपाशी मन । माझ
3373.
तुझे मजपाशी मन । माझी येथे भूक तहान ॥१॥
जिव्हा रते एके ठायी । दुजे बोलायाचे काई ॥धृपद॥
माझिया कवतुके । उभा पहासी भातुके ॥२॥
तुका म्हणे साचे । तेथे मागील कईचे ॥३॥
अर्थ :
तुझे मन माझ्यापाशी आहे त्यामुळेच तर देवा तुला माझी तहान भूक सर्व समजते. माझी जीभ तुझ्या नामाच्या ठिकाणी रत झाली आहे त्यामुळे नामावाचून दुसरे आता काय बोलायचे ? देवा तू माझे कौतुक पाहात उभा आहे आणि मला काहीतरी खाऊ देऊ पाहात आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा असे आपले दोघाचे एकमेकांशी संबंध आहेत मग तेथे मागील संचित कर्म कसे राहतील ?
