हेचि व्हावे माझी आस
3374.
हेचि व्हावे माझी आस । जन्मोजन्मी दास ॥१॥
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥धृपद॥
संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा सुकाळ ॥२॥
चंद्रभागे स्नान । तुका मागे हेचि दान ॥३॥
अर्थ :
देवा माझी नेहमी अशीच इच्छा असावी की मी जन्मोजन्मी तुझाच दास म्हणून राहावा. हे हरी मला पंढरीचा वारकरी कर आणि माझी पंढरीची वारी कधीही चुकवू देवू नको. देवा मला सदा सर्वकाळ संतांची संगती लागू दया आणि अखंड त्यांच्या संगतीत भक्तीप्रेमाचा सुकाळ लागू दयावा. तुकाराम महाराज म्हणतात, आणि चंद्रभागेचे स्नान घडू दे हेच दान मी तुला मागत आहे.
