हरिभक्ता सन्मार्ग दि
392.
हरिभक्ता सन्मार्ग दिधला हा वाटा ।
निजभक्ता-निष्ठा पुण्यवंत ॥१॥
दया हे करावी भक्ति-पुरस्कारे ।
रामनाम त्वरे मुखी गावे ॥२॥
संतांचे पूजन शास्त्रांसी सन्मान ।
अखंड अर्चन ब्रह्मपूजा ॥३॥
गंगा गोदावरी काशी तीर्थयात्रा ।
तेणेचि पवित्रा देह करी ॥४॥
भूतमात्री भाव सांडोनी मीपण ।
आठवी चरण राघवाचे ॥५॥
बहेणि म्हणे हेचि कर्म भागा आले ।
दुसरा न चले उपाय हा ॥६॥
