वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

रासभासी कळा शिकविले

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076304 · अभंग क्र. ३९३

393.
रासभासी कळा शिकविले ज्ञान ।
स्वधर्माचरण काय सांडी ॥१॥
तैसा जो स्वभाव निंदका हरिभक्ता ।
सांडी तो हे वार्ता स्वप्ना न ये ॥२॥
मर्कटासी जरी सुखासन दिधले ।
तरि काय सोहळे होती तया ॥३॥
श्वानाचिया अंगा लाविला चंदन ।
उकिरडा-शयन न करी काई ॥४॥
घुसी उंदरांसी वाउनी मंचकी ।
काय उकीर सेखी न काढिती ॥५॥
सर्पा-विंचवासी शर्करादि दूध ।
काय ते पा शुद्ध विष नोहे ॥६॥
वाघुळासी घरी आणुनि ठेविले ।
उफराटे टांगिले न सोडी ते ॥७॥
बहेणि म्हणे तैसे अभक्तांचे स्वभाव ।
शिकविल्या ठाव न सांडिती ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग