वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

प्रणवाचे आकाश असे सर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075152 · अभंग क्र. ४०१

401.
प्रणवाचे आकाश असे सर्वांवरी ।
आकाशी भरोवरी प्रणवाची ॥१॥
प्रणव जे गुह्य ऋषी योगीयांचे ।
सर्वावरिष्टा साचे वेद आज्ञा ॥२॥
एका वेदांत सिद्धांती प्रणव तो तत्त्वता ।
ज्ञानदेव वक्ता सांगतसे ॥३॥

अर्थ :
प्रणवाचे आकाश देहातील सर्व चक्रांच्या वर आहे. त्या आकाशांत सर्वत्र प्रणवच आहे. प्रणव हे ऋषी, मुनी, योगी यांचे गुह्यज्ञान आहे. प्रणव हा सर्वात श्रेष्ठ आहे. असे वेदही प्रतिपादन करतात. वेदाचा सिद्धांत एक प्रणवच आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग