वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विठ्ठल-ऐक एक माते सं

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076370 · अभंग क्र. १५६

156.
विठ्ठल-ऐक एक माते संदेह मानसी ।
वाटला तयासी कोण फेडी ॥१॥
गणगोत आम्हा मायही सद्गुरू ।
मनीचा निर्धारू जाणसी तू ॥२॥
‘ बारा जन्म मागे साधलिया ज्ञान ।
आता माझे मन स्थिरावले’ ॥३॥
याचे काही मज नकळे सर्वथा ।
आशंका हे आता फेडी माझी ॥४॥
जाणसी अंतर मनीचा तू हेत ।
आहेचि ते चित्त साक्ष तुझे ॥५॥
पूर्वानुक्रमे जन्म ते सांगिजे ।
माते कृपा कीजे येक वेळा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग