बहेणाबाई-ऐक सावधान प
157.
बहेणाबाई-ऐक सावधान पुत्रा तू वचन ।
बोलो नये मौन सांगतसे ॥१॥
न बोलावे कोणा न सांगावे गुज ।
साक्ष माझी मज आली असे ॥२॥
न सांगता तुज खेद हो वाटेल ।
हेतही तुटेल अंतरीचा ॥३॥
बहेणि म्हणे कदा न सांगावे जना ।
ऐकोनिया मना हेत फेडी ॥४॥
