अंतकाळ वेळे होईल निर
155.
अंतकाळ वेळे होईल निरभ्र ।
दिशा होती शुभ्र पाहे का रे ॥१॥
घेई याची साक्ष आपुले अंतरी ।
राहुन निर्धारी आपुलिया ॥२॥
येऊ निघाले तीर्थासी विमान ।
हेलावे ते जाण तीन येती ॥३॥
दग्ध जालियाने अस्तंगत देहे ।
पुत्रा तूची पाहे मनामाजी ॥४॥
बहेणि म्हणे तुम्ही धरोनि विश्वास ।
पहा साक्ष यास तुकाराम ॥५॥
