वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 12. राधाविलास - अभंग ७८ ते १०२

बाळ रांगणे रांगतु ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085195 · अभंग क्र. ९९

99.
बाळ रांगणे रांगतु । दुडदुडां पुढे पळतु । धरिता तो न कळे मातु । वेदशास्त्री जया ॥१॥
तो बाळरुपें नंदाघरीं । खेळ खेळे नानापरी । न कळे लाघव निर्धारी । इंद्रादिका गे माय ॥२॥
लोणी चोरावया घरोघरी जाय । दही दूध तूप लोणी आपण खाय ।
त्यांचे सुनेचे मुखा हात पुशी वो माय । ऐसे करुनियां पळोनी जाय ॥३॥
वासुरे सोडी घरी जाऊन । मुलांसि उठवी चिमटुन ।
माथणी रांजणा करी चुर्ण । ऐसे विंदान करुनी पळे ॥४॥
शेजे असता उभयतं । जाय सोवळ्यातुन तत्त्वता ।
दाढी वेणी बांधी सर्वथा । जाय परता पळोनी ॥५॥
ऐशा खोडी करी नानापरी । नटनाटक वैकुंठ जिव्हारी ।
एक जनार्दनी नवल परी आगमा निगमां न कळे परोपरी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग