वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

योगी शिणती साधनी । प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086118 · अभंग क्र. १४२१

1421.
योगी शिणती साधनी । पावन होती ते कीर्तनी ॥१॥
अष्टांग धूम्रपान । तया श्रेष्ठ हे साधन ॥२॥
समाधी उन्मनी । कीर्तनी पावन हे दोनी ॥३॥
चौदेहांसी अतीत । कीर्तनी होती ते मुक्त ॥४॥
कर्म धर्म न लगे श्रम । व्यर्थ वाउगा विश्रांम ॥५॥
कीर्तन छंद निशिदिनीं । एका शरण जनार्दनी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग