वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

वृत्तीचा उच्छेद मनाच

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074306 · अभंग क्र. ६५३

653.
वृत्तीचा उच्छेद मनाचा निग्रह ।
धारणा विग्रह तेज तत्त्वी ॥१॥
बिंबामाजी बिंब हरपले स्वयंभ ।
मायेचा पै लोभ अरता जाला ॥२॥
नाही तेथे छाया मायेचा विलास ।
घरभरी पैस दीपी रया ॥३॥
बापरखुमादेविवर ज्ञानदेवा धन ।
वस्तुची विवरण तेजाकारे ॥४॥

अर्थ :
अनात्मवृत्तीचा उच्छेद म्हणजे नाश आणि मनाचा विषयापासून निग्रह म्हणजे धारणा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर. असे केले म्हणजे परमात्मरूप बिंबात जीवरुप बिंब लय पावून तू स्वतःच परमात्मरुप होशील. मग आपोआप मायेचा लोप अरता' म्हणजे निकृष्ट झालाच असे समज. त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी छायारुप जीव किंवा मायेचा विलास हे काही एक नसुन स्वयंज्योतीरुप जे माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविेठ्ठल असा जो परमात्मा त्याचा सर्व त्रैलोक्य रुपी घरात विस्तार होईल. तसेच घनदाट जो तेजाकार परमात्मा त्या परमात्म वस्तुचा माझे ठिकाणी विस्तार झाला आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग