( श्लोक रचना आहे)
3376.
( श्लोक रचना आहे)
तुजवाचुनी मागणे काय कोणा । महीमंडळी व्यापक विश्व जाणा ।
जीवभावना पुरवू कोण जाणे । तुजवांचुनी होत का रावराणे ॥१॥
नसे मोक्षदाता तिहींमाजि लोका । भवतारकु तूजवांचुनि एका । मनी मानसी चिंतिता रूपनाम । पळे पाप ताप भये नासे काम ॥२॥
हरी नाम हे साच तुझे पुराणी । हरीहातिचे काळगर्भादियोनी । करू मुखवाणी कसी देशघडी । तुजवांचुनि वाणिता व्यर्थ गोडी ॥३॥
भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वर्णिता शीणला शेषफणी ।
असो जीव भाव तुझ्या सर्व पायी । दुजे मागणे आणीक व्यर्थ काई ॥४॥
दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिने तारिली पातकी थोर दोषी । तुका राहिला पायि तो राख देव । असे मागतो तुझी पादसेवा ॥५॥
अर्थ :
देवा तुझ्यावाचून दुसऱ्या कोणाला काय मागावे कारण तू या महीमंडळातच नाही तर सर्व विश्वात व्यापलेला आहे. देवा कितीही राजे आणि राव असले तरी देखील माझ्या अंत:करणातील ओळखून माझी इच्छा पूर्ण तुझ्यावाचून दुसरा कोण करेल माझा जीवभाव तूच एक जाणतोस माझ्या अंत:करणातील इच्छा देखील तूच जाणतोस व तूच त्या पूर्ण करणारा आहेस. देवा तुझ्या एकटया वाचून त्रैलोक्यामध्ये कोणीही मोक्षदाता नाही किंवा कोणीही या भवसागरातून तारणारा नाही. देवा तुझ्या नाम आणि रुपाचे मनामध्ये चिंतन केले तर तुझ्या नाम आणि रुपाच्या भयानेच पाप ताप पळून वासना नाहीसे होते. देवा तुझे हरी हे नाम पुराणामध्ये अतिशय प्रसिध्द आहे कारण हरीनाम गायिल्यामुळे काळाच्या हातातून सुटका होते व अतिनीच योनीत जन्म होणार असेल तरी तो गर्भवास टळतो. देवा तुझ्या वर्णनावाचून मी इतरांचे वर्णन करु कसे मी करणारच
