नामाचे सामर्थ्य नेणे
658.
नामाचे सामर्थ्य नेणे वेदशास्त्र | शेषाची वक्त्रे मौनावली ॥१॥
गंगा गणपती चंद्र सूर्य श्रेष्ठ | शंकर वरिष्ठ मौनावले ॥२॥
भीष्म पराशर उद्धव अंगद | ब्रह्मा मुचकुंद मौनावले ॥३॥
नामा म्हणे येरे काय जाणे स्तुति | दाटोनि श्रीपती उभा केला ॥४॥
