करी घेऊनि ब्रह्मविणा
659.
करी घेऊनि ब्रह्मविणा | नारद वोळगे नारायण ॥१॥
हेचि हेचि तत्त्व सार | नाम म्हणे निरंतर ॥२॥
आपण शिव आणि शक्ति | रामनाम ते जपती ॥३॥
गात नाचत प्रल्हाद वीर | खांबी केलासे अवतार ॥४॥
कुंटिणी पक्षिया म्हणे राम | तिसी नेले निजधामा ॥५॥
अहल्येसी लागता चरण | तिसी आले मनुष्यपण ॥६॥
अजामेळ पातकी अपार | नामे पावला पैलपार ॥७॥
गजेंद्रे केले स्मरण | त्याचे तोडिले बंधन ॥८॥
द्रौपदी स्मरे हृषीकेसी | वस्त्रे पुरविली तियेसी ॥९॥
परीक्षितासी घडले स्मरण | त्यासे जाले सुलभ चरण ॥१०॥
नामा म्हणे निरंतरु | गगनी अढळ केला धुरू ॥११॥
