(तुकोबांच्या अभंगाती
3479.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
नाही घाटावे लागत । एका सिते कळे भात ॥१॥
क्षीर निवडिते पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥धृपद॥
आंगडे फाडुनि घोंगडे करी । अवकळा तयापरी ॥२॥
तुका म्हणे कण । भुसी निवडे कैचा सीण ॥३॥
अर्थ :
एका भाताच्या शितावरुन भात शिजला आहे किंवा नाही याची तपासणी होते त्यासाठी संपूर्ण भात तपासावा लागत नाही. हंस आपल्या चोचीने पाणी आणि दूध वेगवेगळे करतो. अंगातील कपडे काढून ते फाडून त्याचे घोंगडे तयार करणे हा प्रकार जसा आहे त्याप्रमाणेच हा सालू मालू माझे काव्य चोरुन त्यामध्ये त्याचे नांव टाकतो आहे अगदी तसाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कण आणि भूस निवडण्यास त्रास कसला त्याप्रमाणे जे मनुष्य सज्ञान आहेत ज्ञानी आहेत त्यांना सालू मालूचे काव्य् कोणते व संतांचे काव्य कोणते हे लगेच कळेल.
