वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(तुकोबांच्या अभंगाती

🙏 3. संत तुकाराम · ABH-080873 · अभंग क्र. ३४८०

3480.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
सालोमालो हरीचे दास । म्हणउन केला अवघा नास ॥१॥
अवघे बचमंगळ केले । म्हणती एकाचे आपुले ॥धृपद॥
मोडूनि संतांची वचने । करिती आपणा भूषणे ॥२॥
तुका म्हणे कवी । जगामधी रूढी दावी ॥३॥

अर्थ :
सालू मालूने स्वत:ला हरीचा दास म्हणून घेतले आणि सगळा सर्वनाश करुन घेतला. इतरांनी म्हणजेच संतांनी केलेले अभंग रचनेमध्ये आपले नांव मिसळवले व आपणच हे काव्य तयार केले आहे असे लोकांना तो सांगत आहे आणि असे करुन त्याने सर्व गोंधळच केला आहे. संतांनी केलेले काव्य रचनेमध्ये आपले नांव मिसळून हे काव्य आपणच केले आहे असे भूषण तो सर्वत्र सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे असले खोटे कवी जगामध्ये आपली किर्ती पसरवितात व खोटी रुढी जगामध्ये निर्माण करतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग