वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

भक्त अमर स्वस्तिक्षे

🙏 4. संत नामदेव · ABH-081714 · अभंग क्र. १००३

1003.
भक्त अमर स्वस्तिक्षेम | चरणरजे डौरले व्योम | मग कैलासी मंदाकिनी सोम | नीळकंठे सिरी धरियेली ॥१॥
धन्य विष्णुचरणींची गंगा | स्नपन होत महालिंगा | भीमरथी म्रुत्युलोकी सवेगा | इंद्रायणीसमरसे ॥२॥
भोगावती पाताळात गेली | मग विष्णुचरणी गुप्त ठेली | मग पुरोनिया उरली | त्र्यंबक सिखरी ॥३॥
मग कितेका काळे भागीरथी | भगीरथे आणिली भारथी |सगर उद्धरिले त्वरिती | विष्णुतीर्थे करुनिया ॥४॥
ऐसी त्रिभुवनी ज्याची थोरी | तो मुकुटमणी हा हो श्रीहरी | त्यांते सोडिलिया मुक्ति चारी |काय आम्हा तारिती ॥५॥
सर्वे तीर्थे ज्याचे रंक | आम्ही तयाचे सेवक | ज्याचेनि नामे हे त्रैलोक्य | नामा घेता तरत ॥६॥
तो पूर्ण बीजमंत्र आम्ही जाणो | विष्णुविण कांही नेणो | पूर्ण ब्रह्म काय म्हणो | हा महिमा तू जाणसी ॥७॥
ज्ञानदेवे नमस्कारिले हरी | निव्रुत्ति सोपान झडकरी |मुक्ताई भेटली लवकरी |ज्ञानदेवा करी धरियले ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग