वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 59. हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७

ॐ नमोजी सदाशिवा । ब्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085654 · अभंग क्र. १००४

1004.
ॐ नमोजी सदाशिवा । ब्रह्मादिकांन कळे लाघवा । तुम्ही स्वामी देवाधिदेवा । ध्यान करितासां कवणाचें ॥१॥
ऐक रमणीय पार्वती त्रैलोक्यांत ज्याची कीर्ति । पुराण वेद जया वानिती । तो श्रीपती ध्योती मी ॥२॥
आवड कीर्तन चित्ती । रंगी नाचतो जया वैकुंठपति । माझी धांव तेथे निश्चिती । ते सुखविश्रांती काय सांगूं ॥३॥
भाळे भोळे हरीचे दास । कीर्तनरंगीं नाचती उदास । त्यांच्या भार वाहें मी सर्वेश । उणे तयांस येऊ नेदी ॥४॥
ऐसा अनुवाद कैलासगिरीं । गिरिजेसी सांगे त्रिपुरारी । एका जनार्दनी सत्य निर्धारी । कीर्तनगजरीं उभे तिन्ही देव ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग