न माये चराचरी त्रैलो
116.
न माये चराचरी त्रैलोक्य उदरी । तो यशोदेचे कडेवरी शोभतो कैसा ॥१॥
गोपवेष मिसे ब्रह्माया लाविले पिसे । तो गोपावत्सवेंषेम शोभतो कैसा ॥२॥
एके घटिकेवरी सोळा सहस्त्र घरी । नोवरा श्रीहरी शोभतो कैसा ॥३॥
आंगनंविण अंगे गोपी भोगिल्या श्रीरंगें । तो कृष्ण निजांगे शोभतो कैसा ॥४॥
सच्चिदानंदाघन तान्हुलें आपण । एका जनार्दन शोभतो कैसा ॥५॥
