वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 13. श्रीकृष्णाचा वेध - अभंग १०३ ते ११८

प्रथम मत्स्यावतारीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087140 · अभंग क्र. ११७

117.
प्रथम मत्स्यावतारीं तुमचे अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिका वैष्णव गाती पवित्र ॥१॥
उठोनि प्रातःकाळी गौळणीं घुसळन घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयी परोपरी ध्याती ॥२॥
द्वितीय अवतारीं आपण कच्छरुप झाला । सृष्टी धरुनी पृष्ठी शेवटी सांभाळ केला ॥३॥
तृतीय अवतारीं आपण वराहरुप झाला । धरणी धरुनी दाढे हिरण्याक्ष वधिला ॥४॥
चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रुप । रक्षुनि प्रल्हाद वधिला हिरण्यकश्यप ॥५॥
पांचवें अवतारी आपाण वामन झाला । बळी घालुनि पाताळी शेखी द्वारपाळ ठेला ॥६॥
सहावे अवतारीं आपण परशुराम झाला । धरुनी परशु हाती सहस्त्रभुजा वध केला ॥७॥
सातवें अवतारी आपण दाशरथी राम । वधोनी राव्ण कुंभकर्ण सुखी देव परम ॥८॥
आठवें अवतारी आपण अवसुदेवाघरी । वधोनि कंसादिक असुर मारिले भारीं ॥९॥
नववे आवतारीं आपन बौद्धरुप झाला । धरुनिया मौन भक्तघरीं राहिला ॥१०॥
दहावए अवतारीं आपण झालासें वारु । एका जनार्दनी वर्णिला त्याचा बडिवारु ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग