वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

प्रकाश निर्मले कोमल

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076360 · अभंग क्र. ६१९

619.
प्रकाश निर्मले कोमल कमलोद्भव ।
देखुनि रमला तेथे भ्रमराचा भाव ।
ऐसा प्रेमळ सीतळ तारापति देव ।
अनुभव-सिद्धा देतो मुक्तीचा ठाव ॥१॥
जयदेव जयदेव जय रजनीकांता ।
दर्शनमात्रे निवविसि भवतापव्यथा॥धृ॥
प्रतिमासा-अंती द्वितिया येती जन्माची ।
राका येता प्रतिमा पूर्ण बिंबाची ।
चतुर्थीची पूजा भाविक भक्ताची ।
गोपाळाते छाया करिसी कृपेची ॥२॥
नव रत्नाहूनी रत्न शास्त्राचा विवेक ।
उपसे तुजई तुळिता तुझा तूचि एक ।
शिवमौळीचे भूषण लुब्ध चकोर ।
भक्ती भजता सिद्ध साधी पद पहिला पद्क अपूर्ण ) ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग