वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जय सद्गुरूराया माझी

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076034 · अभंग क्र. ६२०

620.
जय सद्गुरूराया माझी निरसी माया ।
ठेवितसे मस्तक तव चरणी ।
नश्वर संपत्ति जाया॥धृ॥
नसते मीपण घेउनिया ।
देहे केले सर्वही जाया ।
दृश्य पदार्थ अमित भ्रमास्तव ।
अंतरले गुण गाया ॥१॥
जन्मजराभय दुस्तर वारूनी ।
सांग तु मोक्ष-उपाया ।
पुत्रकलत्र विचित्र मनी सुख ।
जाइल सर्वही वाया ॥२॥
बहिणी म्हणे गुरूपदांबुज इच्छितसे वर द्याया ।
जय सद्गुरूराया ।
माझी निरसी माया ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग