रामनामे तारिले । पशु
772.
रामनामे तारिले । पशु पक्षी उद्धरिले ॥१॥
ऐसे रामनाम बोध । घेई का रे तू शुद्ध ॥२॥
तारिले तारिले । रामनामे उद्धरिले ॥३॥
शुकादिक योगी झाले । रामनामे ते रंगले ॥४॥
ब्रह्माज्ञानी महा मुनी । रामनाम जपती वाणी ॥५॥
एका जनार्दनी राम । नाम करी तु विश्राम ॥६॥
