व्यासादिका गाती ज्या
771.
व्यासादिका गाती ज्यासी । शुक सांगे परीक्षितीसी ।
श्रीकृष्ण उपदेशी उद्धवासी । नाम सार कलींत ॥१॥
तोचि वेध बैसला मना । ध्यानीं मनी रामराणा ।
नाही दुजी उपासना । नामापरते साधन ॥२॥
वेदशास्त्र पुराणे । नामापरतें नाही घेणे ।
एका जनार्दनी म्हणे । नाम उत्तम चांगलें ॥३॥
