(व्यभिचारिणी स्त्रीच
3444.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
त्याचे सुख नाही आले अनुभवा । कठिण हे जिवा तोचिवरी ॥१॥
मागिलांचे दुःख लागो नेदी अंगा । अंतर हे संगा नेदी पुढे ॥२॥
तुका म्हणे सर्वविशी हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसे ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)जोपर्यंत परपुरुष श्रीहरीचे सुख अनुभवायला येत नाही तोपर्यंत परमार्थ कठीण वाटतो. एकदा की त्याच्या सुखाचा अनुभव आला की मग तो श्रीहरी आपल्याला मागील कोणत्याही दु:खाचे स्मरण देखील होऊ देत नाही आणि अनुभव आल्याच्या पुढे देखील तो त्याच्यामध्ये व आपल्यामध्ये अंतर पडू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरी सर्वगुणसंपन्न आहे त्याचे महिमान वेद श्रृती देखील जाणतात.
