(व्यभिचारिणी स्त्रीच
3442.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
आहांच वाहांच आत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हा तैशा ॥१॥
भेऊ नये तेथे भेडसावू कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥
तुका म्हणे काही अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)आमच्याबरोबर परमार्थ करणाऱ्या स्त्रीयांनी मनात एक आणि बाहेर एक असा व्यवहार करु नये तसे जर असेल तर आम्हाला अशा मैत्रिणी नको आहेत. आम्ही स्वत:च कुणाला भीत नाही तर मग आम्ही दुसऱ्याला भिती कशासाठी दाखवू परंतू तुम्ही तुमच्या मनाला आवरुन प्रतिबंध करावा. तुकाराम महाराज म्हणतात, विवेक आणि वैराग्य या दोन्हीचाही अभ्यास केल्याशिवाय इतर कोणतेही साधने करणे म्हणजे दांभिकपणाचे लक्षण आहे व त्याने श्रीहरी आपल्याला कधीही मिळणार नाही.
