वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(व्यभिचारिणी स्त्रीच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080748 · अभंग क्र. ३४४५

3445.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
न राहे रसना बोलता आवडी । पायी दिली बुडी माझ्या मने ॥१॥
मानेल त्या तुम्ही अइका स्वभावे । मी तो माझ्याभावे अनुसरले ॥२॥
तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुती । माझी तो हे गती झाली आता ॥३॥

अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)परपुरुष जो श्रीहरी त्याच्याविषयी बोलताना माझ्या जीभेला राहावतच नाही सारखे त्याचे गुण वर्णन करतच राहाते आणि माझ्या मनाने देखील त्याच्या पायाच्या ठिकाणी बुडी दिली आहे. अहो तुम्हाला जर माझी गोष्ट सत्य वाटत असेल तरच तुम्ही खरी माना मी तर पूर्ण भावनेने त्याला अनुसरलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना परपरुष श्रीहरीकडे यायचे नसेल त्यांनी पुन्हा संसाररुपी नवऱ्याकडे परत मागे फिरावे तुम्ही खूप जणी आहात त्यामुळे मागे गेलात तरी चालेल परंतू मी माझ्या परपुरुषरुपी श्रीहरीला अनुसरले आहे ही अशी अवस्था आता माझी झालेली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग