वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

( ज्ञानेश्वरमहाराजां

🙏 3. संत तुकाराम · ABH-080845 · अभंग क्र. ३३९९

3399.
( ज्ञानेश्वरमहाराजांना महाराज म्हणतात)
बोलिली लेकुरे । वेडी वांकुडी उत्तरे ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥धृपद॥
नाही विचारिला । अधिकार म्या आपुला ॥२॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायापे किंकरा ॥३॥

अर्थ :
हे ज्ञानराज माऊली मी लहान लेकरु आहे मी जे काही वेडेवाकडे शब्द बोललो आहे बोबडे शब्द बोललो आहे. महाराज मी जे काही शब्द बोललो असेल त्यामध्ये काही चुकीचे शब्द आले असतील तर त्या अपराधाबद्दल मला तुम्ही क्षमा करा तुम्ही सिध्दमहापुरुष आहात. हे ज्ञानेश्वर माऊली मी बोलताना आपल्या अधिकाराचा विचारच केला नाही उगाचच मी बडबड करत राहिलो. तुकाराम महाराज म्हणतात, हे ज्ञानेश्वर महाराज मला या किंकर दासाला तुमच्या पायाजवळ नेहमी राखा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग