(श्री ज्ञानेश्वर महा
3400.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठविलेल्या धरणेकऱ्यासउपदेश. )
काय तुम्ही जाणा । करू अव्हेर नारायणा ॥१॥
तरी या लटिक्याची ग्वाही । निवडिली दुसरे ठायी ॥धृपद॥
कळो अंतरीचा गुण । नये फिटल्यावाचून ॥२॥
आणिले अनुभवा । जनाच्या हे ज्ञानदेवा ॥३॥
आणीक कोणी भीती । त्यांच्या चिंतने विश्रांति ॥४॥
तुका म्हणे बीज पोटी । फळ तैसेंचि शेवटी ॥५॥
अर्थ :
तुम्ही नारायणाचा अव्हेर करण्याचे मनात आणले आहे काय ? खोटी साक्ष देणारा मनुष्य नंतर लक्षात येतो. कोणतेही फळ असो ते फोडल्यावाचून त्याच्या अंतरंगात गोडपणा आहे की कडूपणा आहे हा गुण कळून येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी लोकांच्या अनुभवास या गोष्टी आणून दिल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी असा अनुभव आणून दिला आहे की देवाचे चिंतन केले की विश्रांती आणि समाधान मिळते तर मग इतर कोणाची काय भिती आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, जशी भावना आपल्या पोटामध्ये आहे तसेच फळ शेवटी आपल्याला मिळते.
