सुटायाचा काही करितो
230.
सुटायाचा काही करितो उपाय । तो हे देखे पाय गोवियेले ॥१॥
ऐसिया दुःखाचे सापडलो संधी । हारपली बुद्धी बळ माझे ॥२॥
प्रारब्ध क्रियमाण संचिताचे । वाढेत ठायींचे आले साचे ॥३॥
विधी निषेधाचे सांपडलो अंगे । तृष्णेचिया संगे दुःखी झालो ॥५॥
तुका म्हणे आता करी सोडवण । सर्व शक्तिहीन झालो देवा ॥६॥
