वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

संसाराच्या तापे तापल

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072576 · अभंग क्र. २२९

229.
संसाराच्या तापे तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊणी तुझे आठविले पाय । येवो माझे माय पांडुरंगे ॥२॥
बहुत जन्मीचा झालो भारवाही । सुटिजे हे नाही वर्म ठावे ॥३॥
वेढियेलो चोरी अंतर्बाह्यात्कारी । कणव न करी कोणी माझी ॥४॥
बहु पांगविलो बहु नागविलो । बहु दिवस झालो कासावीस ॥५॥
तुका म्हणे आता धांव घाली वेगी । ब्रीद तुझे जगी दीनानाथा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग