वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 114. गोकुळाचा शोकाकुल देखावा

गोकुळाचा शोकाकुल देख

🙏 4. संत नामदेव · ABH-083841 · अभंग क्र. २०३

203.
गोकुळाचा शोकाकुल देखावा

सारथ्यासी सांगे हांकी हा रथवर । पाहियेले तीर यमुनेचे ॥१॥
उभा राहोनिया पाहे चहूंकडे । बोलताती कोडे पक्षी-राज ॥२॥
व्याघ्र आणि गायी एकत्र बैसती । कोळिका बोलती कृष्ण कृष्ण ॥३॥
सर्प आणि नाग निस्तेज पडती । चिमण्या बो-लती कृष्ण कृष्ण ॥४॥
वियोगाने तेव्हा मयूरे रडती । शुक डोल-ताती कृष्ण कृष्ण ॥५॥
कृष्णाच्या कृपेने कळले उद्धवासी । धन्य धन्य त्यांसी ह्मणे तेव्हा ॥६॥
ब्रह्मज्ञान सांगो देवे पाठविला । तो रडू लागला तयेवेळी ॥७॥
नामा ह्मणे आला नंदाचिया घरा । पुढले अवधारा निरोपण ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग