गोकुळाची उदास स्थिती
200.
गोकुळाची उदास स्थिती
युगांबरोबरी जाताती घटिका । गोकुळींच्या लोका तैसे झाले ॥१॥
उदास दिसती वने दाही दिशा । कायरे जगदीशा आह्मा केले ॥२॥
वेडावल्या गायी करिताती खंती । वत्स न क-रिती स्तनपान ॥३॥
अन्नपाणी तेव्हा वर्जिती गौळणी । आता चक्रपाणी कैंचा आह्मा ॥४॥
यमुनेचे तीरी वृक्ष ते सुकले । पाषाण उलले तया दु:खे ॥५॥
प्रात: काळी गडी अवघेचि बोलती । मा-रूनि श्रीपति गेला नाही ॥६॥
जीवनाविण मत्स्थ जैसे तळमळती । नामा ह्मणे चित्ती धन्य प्रेमा ॥७॥
