वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 122. कुंतीचा श्रीकृष्णास निरोप

कुंतीचा श्रीकृष्णास

🙏 4. संत नामदेव · ABH-083840 · अभंग क्र. २११

211.
कुंतीचा श्रीकृष्णास निरोप

निरोप हा माझा सांगरे कृष्णाला । भरंवसा मजला आहे तुझा ॥१॥
अच्युता अनंता श्रीधरा वामना । अगा नारा-यणा शरण तुज ॥२॥
जनार्दन हरि त्रिविक्रम केशवा । अगा वासुदेवा शरण तुज ॥३॥
गोविंदा माधवा अगा मेघ: शामा । अगा पुरुषोत्तमा शरण तुज ॥४॥
चक्रपाणी अगा वैकुंठनायका । रक्षी या बाळका दासा तुझ्या ॥५॥
त्रिविधतापे माझी जळतसे काया । दावी मज पाया एक वेळा ॥६॥
विदुर अक्रूर करिती समाधान । करावे श्रवण नामा म्हणे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग