वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

दुर्लभ होते ते सुलभ

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075528 · अभंग क्र. ३०

30.
दुर्लभ होते ते सुलभ पै झाले । आपण नटले सगुण रूप ॥१॥
धरोनी आवडी पंढरीये आले । उभेंचि राहिले कर कटी ॥२॥
युगे अपरंपार न कळे ज्याचा पार । वैष्णवांचा भार शोभतसे ॥३॥
दिंड्या गरूड टके पताका शोभती । बागडे नाचती हरिदास ॥४॥
चोखा म्हणे ऐसे धरोनिया भीड । उभा उभी कोड पुरवितो ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग