ज्या सुखाकारणे योगी
29.
ज्या सुखाकारणे योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ति तयांलागी ॥१॥
ते प्रेमभावे पुंडलिका वोळले । उघडेंचि आले पंढरीये ॥२॥
कर ठेवोनि कटी उभा पाठीमागे । भक्तांचिया पांगे बैसेचि ॥३॥
युग अठ्ठावीस होऊनिया गेले । नाही पालटले अद्यापवरी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा कृपाळू श्रीहरी । कीर्ति चराचरी वानिताती ॥५॥
