वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तीर्थे केलियाने स्ना

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076350 · अभंग क्र. ५२६

526.
तीर्थे केलियाने स्नान देहमळ ।
नासती सकळ निश्चयेसी ॥१॥
परी मनोमळ नाश नव्हे जाण ।
श्रीगुरूवाचून सत्य सत्य ॥२॥
प्रतिमा पूजलिया देहदंड जाला ।
सार्थकाला आला देह त्याचा ॥३॥
बहेणि म्हणे शुद्ध निर्विकार ।
होईल निर्धार गुरूकृपे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग