चित्तासी विवेक वैराग
527.
चित्तासी विवेक वैराग्य यावया ।
ज्ञान साधावया मूळ हेचि ॥१॥
सद्गुरूचा हस्त मस्तकी घेसील ।
तरी पावसील ब्रह्मपद ॥२॥
सर्वत्र समान ब्रह्म परिपूर्ण ।
व्यापक चैतन्य तैच होय ॥३॥
बहेणि म्हणे चित्त स्थिर तैच घडे ।
ब्रह्मत्व आतुडे रोकडेची ॥४॥
