निर्विकार नोव्हे चित
525.
निर्विकार नोव्हे चित्त देवतीर्थी ।
हिंडलेती क्षिती जरी नाना ॥१॥
संत-समागमे शुद्ध होय चित्त ।
वासना विरक्त क्षणे होये ॥२॥
निर्विकार नोव्हे चित्त कर्मामाजी ।
गायी गज वाजी दिधलिया ॥३॥
बहेणि म्हणे याचे वरं संतसंगे ।
कळतसे अंगे साधनेचे ॥४॥
