वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

धावोनि मी येतो परि न

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088881 · अभंग क्र. ५७६

576.
धावोनि मी येतो परि नेणे मारग ।
तूचि लागवेग करी आता ॥१॥
अनाथ मी दीन रंक शरणांगत ।
म्हणूनिया त्वरित सांभाळावे ॥२॥
अहो दीनानाथा दीनबंधु देवा ।
मनींचा हा उगवावा हेत माझा ॥३॥
तुम्हा तो येविशी न लगती सायास ।
प्रगटावया दिवस मास पळ ॥४॥
मी तो सर्वभावे आहे बुध्दिहीन ।
नेणे करु ध्यान स्तवन पूजा ॥५॥
निळा म्हणे तुम्ही कृपेचे सागर ।
जाणता अंतर सर्वसाक्षी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग