कोठेचि हा नसे कोठेंह
1495.
कोठेचि हा नसे कोठेंही न दिसे ।
कोठेचि अमुकासे न म्हणे कोणी ॥१॥
कोठे याचे होणे कोठे याचे निमणे ।
कोठूनि येणे जाणे न तर्केचि ॥२॥
कोठे याची स्थिति कोठे याची प्रीति ।
कोठे याची वसती न कळे कोणा ॥३॥
कोठूनि याचे कूळ ।
वर्णावयास आढळ न कळे गोत्र ॥४॥
निळा म्हणे याती न दिसे रुपाकृती ।
नयेचि कोणे व्यक्ती विचार करिता ॥५॥
