अणुरेनुपासोनी सब्राह
510.
अणुरेनुपासोनी सब्राह्म भरला । भरुनी उरला संतापुढें ॥१॥
उघडाची दिसे सर्वा ठायी वसे । मागणेंचि नसे दुजे कांही ॥२॥
कर ठेऊनि कटी तिष्ठत रहाणे । वाट ते पाहनें मागेल कांही ॥३॥
चंद्रभागा तीर पुंडलिकासमोर । एका जनार्दनी हरिहर उभे राहाताती ॥४॥
