विठ्ठल सांवळा पंढरीय
509.
विठ्ठल सांवळा पंढरीये उभा । धन्य त्यांची शोभा सोभतसे ॥१॥
पुंडलिका मागे कर ठेवुनी कटी । समपाय विटीं देखियेला ॥२॥
राही रखुमाई शोभती त्या बाही । बैष्णव दोही बाही गरुडपारीं ॥३॥
एका जनार्दनी पाहुनिया । ध्यान मनाचे उन्मन होत असे ॥४॥
