सकळीं ध्याइला सकळीं
511.
सकळीं ध्याइला सकळीं पाहिला । परी असे भरला जैसा तैसा ॥१॥
युगानुयुगीं मीनले व्यापारी । परी न पवेचि सरी पुंडलीका ॥२॥
मापे केली परी नये अनुमाना । योगियांच्या ध्याना वोथबंला ॥३॥
एकाजनार्दनी मापचि आटचें । मोजणे खुंटविलें पुंडलिकें ॥४॥
