वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 38. हुतुतु - अभंग २१८ ते २३१

कान्होबा सांभाळी आपु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085169 · अभंग क्र. २२८

228.
कान्होबा सांभाळी आपुली गोधने तुझ्या भिडेनें कांही न म्हणे ॥१॥
तु बैसासी कळंबाखाली । वळती देता आमुचे पाय गेली ॥२॥
तुझी गोधनें बा अचाट । धांवती देखोनी विषय हिरवट ॥३॥
तू बैसोनी करिसी काला । आमुच्या शिदोर्‍या करुनी गोळा ॥४॥
खातोसी दही भाताचा गोळा । आम्हाकदे न पहासी उचलोनी डोळा ॥५॥
वेधिलें आमुचे जीवपण । ठकविलें आम्हाकारण ॥६॥
एका जनार्दनी परमानंद । आम्ही भुललों तुज गोविंदा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग