वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 38. हुतुतु - अभंग २१८ ते २३१

गाई चारी कान्होबा ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085163 · अभंग क्र. २२७

227.
गाई चारी कान्होबा । गोपाळ सांगाती उभा । अनुपम्य त्याची शोभा । नाचती प्रेमानंदे ।
गाताती भोगिता छंदे । मन वेधिलें परमानंदे रे कान्होबा ॥१॥
भला कान्होबा भला । भला कान्होबा भला ॥धृ.॥
गौळियांची आंधळीं पोरें । गाईपाठीं धांवतीं सैरें । हरि म्हणे रहा स्थिरें ।
तुमची आमची बोली । पहिलीच आहे नेमिली । त्वा बरीच ओळखी धरली रे कान्होबा ॥२॥
तुझी संगती खोटी । आम्हा धाडिसी गाईचे पाठी । तुं बैससी जगजेठी ।
तिझें काय केले आम्ही । तुं जगाचा हा स्वामी ।
तुझा महिमा आगमनिगमीं । काही न कळे रे कान्होबा ॥३॥
माझी गाय आहे दुधाची । तुला सांपडली फुकाची । मला चोरी काय लोकांची ।
का पडलासी आमुचे डायीं । भिन्न भेद नाही । एक जनार्दनी मन पायी रे कान्होबा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग